Pages In This Blog

Wednesday, April 1, 2026

बळवंतराव अर्थात अण्णासाहेब किर्लोस्कर

बेळगावनिवासी अण्णासाहेब किर्लोस्करांचं पायाभूत कार्य 

लेखक - नंदन हेर्लेकर 

श्री सरस्वती वाचनालय शहापूर-बेळगाव या संस्थेनं नुकतीच १५० वर्षे पूर्ण केली. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळानं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना पूर्ण वर्षभर अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकी अत्यंत जिव्हाळ्याचा उपक्रम म्हणजे संगीत शाकुंतल या नाटकाची निर्मिती! 

या पुरातन वास्तूच्या मूळ जागेत १८७८ मध्ये प्रथम प्रकट झालेल्या या ऐतिहासिक नाटकाद्वारे पहिली ‘एन्ट्री’ नाट्यमहर्षि अण्णासाहेब म्हणजेच बळवंत पांडुरंग किर्लोस्करांनी घेतली. त्याची थोडी माहिती या निमित्तानं आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे. 

एकेकाळी शहापूरचा भाग पटवर्धनांच्या सांगली संस्थानाच्या अखत्यारीत होता. संस्थानाकरवी अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना आश्रय दिला जायचा, त्यापैकी हीही एक संस्था होती. शहापुरातल्या बसवण गल्लीतल्या मराठी शाळेतले एक शिक्षक सरंजामे गुरुजी यांच्या वाचनप्रेमी स्वभावामुळे बाजारातल्या मारुती मंदिरासमोरच्या एक इमारतीमध्ये पुस्तकसंग्रह आणि वाचनाची चळवळ सुरु झाली. त्यांच्या पुढाकारानं १८७४ साली तिथं ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरु झाली. केसरी, ज्ञानप्रकाश अशी मराठी तसंच कांही इंग्रजी, हिंदी, कन्नड वृत्तपत्रे, गुरुजींच्या संग्रहातली बरीचशी पुस्तके याच्या बळावर हे वाचनालय ज्ञानसाधनेचं लोकप्रिय ठिकाण बनलं. 

कोरे गल्लीतल्या वाचनालयाच्या वास्तूच्या निर्माणापूर्वी या जागेत एक बखळ होती. १८७८ साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्थानिक कलाकारांच्या सहाय्याने चार अंकी शाकुंतलचा पहिला प्रयोग या ठिकाणी केला. त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष म्हणून त्या जागी वाचनालयासाठी सुसज्ज इमारत बांधण्याचं ठरलं आणि सरंजामे गुरुजींच्या पश्चात त्यांच्या निस्वार्थी कार्याला पुढं नेण्यासाठी १९३४ मध्ये एक कार्यकारिणी मंडळ अस्तित्वात आलं. बघता बघता अनेकांच्या मदतीनं भक्कम अशी दगडी इमारत उभी राहिली. मुख्य आश्रयदाते असणाऱ्या सांगली संस्थानिकांच्या राणीसरकारांचं नाव सरस्वती असल्यानं आणि विद्यादेवीच्या नित्यस्मरणाला अनुसरून वाचनालयाचं नाव श्री सरस्वती वाचनालय असं ठेवण्यात आलं. 

त्या काळातलं बेळगाव मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, बडोदा अशा मोठ्या मराठी नगरां इतकंच अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं. विद्येचा व्यासंग असणाऱ्या तरुणांच्या आकर्षणाचा हा परिसर होता. १८४३ मध्ये गुर्लहोसूर या छोट्याश्या गावी जन्मलेले बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर या नगराशी संबंध ना ठेवते, तरच आश्चर्य! पंडितकवी मोरोपंत यांच्या घराण्याशी जवळीक असलेलं हे घराणं प्रतिष्ठित होतं. अण्णासाहेबांचे वडील शास्त्रपारंगत, विद्वान आणि संस्कृत पंडित होते. त्यांचा संस्कृत काव्ये आणि नाटके यांचा दांडगा अभ्यास होता. तेच संस्कार अण्णासाहेबांच्या मनावर झाले. वाचनही अफाट असल्यामुळे युवावस्थेतच त्यांना काव्यशास्त्रविनोदाची गोडी लागली. वयाच्या चौदाव्या वर्षीच नाटकं आणि काव्यं रचण्याला त्यांनी सुरुवात केली. कीर्तनकारांना आख्यान रचून देणे, जुन्या कवितांचा, पदांचा संग्रह करणे, हा त्यांचा छंद होता. कन्नड परिसरातला वावर आणि मराठी-संस्कृत अभ्यास यामुळे त्यांच्या साहित्यात बहुश्रुतता आली. 

१८६३ मध्ये अण्णासाहेब शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यावेळच्या शिक्षण पद्धतीनुसार त्यांचं शिक्षण ज्युनिअर फर्स्टक्लास पर्यंत झालं. औपचारिक शिक्षण घेण्यात तसा त्यांना फारसा रस नव्हता. परंतु पुण्यातल्या वास्तव्यात त्यांनी गाण्याच्या बैठका, नाटकं पाहणं, त्यातल्या गरजवंताना कविता करून देणं असे त्यांचे उद्योग सुरु झाले. पुणेकर नाटक मंडळीला त्यांनी त्या काळात समुद्रमंथन, अंबा, अंबिका, विक्रमचरित, अशा अनेक आख्यानांवर कविता रचून दिल्या. तिथलं सांस्कृतिक वातावरण पाहून त्यांना आपणही नाटक लिहावं, सादर करावं अशी प्रेरणा मिळायला लागली. समवृत्ती मित्रांच्या समवेत त्यांनी त्याची सुरुवातही केली. परंतु पुण्यात राहून त्यांना ते साध्य होईलसं वाटलं नाही. त्याच काळात म्हणजे १८६७ मध्ये त्यांनी ‘श्री शिवाजी महाराजांचे कार्य’ हा ५०० आर्यांचा ग्रंथ लिहिला. 

झाले तेवढे शिक्षण पूर्ण करून ते गुर्लहोसुरला परत आले. वकिली करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यात यश मिळवण्याची वाट न बघता ते बेळगावला ‘अंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल’मध्ये शिकवण्याच्या नोकरीला लागले. तिथं असतानासुद्धा त्यांचं नाटकाकडे सातत्यानं लक्ष होतं. बेळगावात आलेल्या नाटक मंडळींचा शोध घेण्याचा त्यांचा उपक्रमही सुरु असायचा. संपर्ककला, रसिकवृत्ती, मनमोकळं बोलणं या स्वभावामुळे ते सर्वाना लगेच आपलेसे वाटत. त्याच सुमाराला म्हणजेच १८७३ मध्ये त्यांनी ‘शांकर दिग्विजय’ हे श्री शंकराचार्यांच्या जीवनावरचं नाटक लिहून प्रसिद्ध केलं. त्या काळातली सर्वात महत्वाची बाब अशी की तेव्हाची नाटके ही काव्याच्या आधारावर सादर होत. पात्रांची संभाषणे त्या त्या वेळी जशी सुचतील तशी असत. नाटककर्त्याचे लिखित संवाद जवळ जवळ नसतच. एकदा झालेलं संभाषण पुढल्या वेळी तसंच होईल याची खात्री त्या पात्रांनाही नसे. त्यामुळे अण्णासाहेबांनी हे नवं नाटक लिहून त्याचा प्रयोग करण्यापूर्वी ‘बेळगाव समाचार’मध्ये “पुस्तकात लिहिल्याप्रमाणे संवाद पात्रे म्हणतील” अशी जाहिरात छापली होती. 




फोटो सौजन्य - इंटरनेट 


मराठी रंगभूमीच्या उत्क्रांतीचा हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि ती किमया अण्णासाहेबांनी बेळगावात घडवून आणली. या नाटकाचे प्रयोग इचलकरंजीकर, कोल्हापूरकर, सांगलीकर मंडळी करत असत. याच काळात ‘अल्लाउद्दीनची चितुरगडावर स्वारी’ हे नाटक अण्णासाहेबांनी लिहिलं. ते शिळाप्रेसवर छापलं होतं. सांगलीकर मंडळी त्याचा प्रयोग करत. आज त्याची संहिता उपलब्ध नाही. बेळगावात अशा प्रकारे अण्णासाहेबांच्या नाट्य चळवळीमधूनच नव्यानव्या कल्पना जन्माला आल्या. त्यांनी ‘भरत शास्त्रोत्तेजक’ या नावाची नाटक कंपनी सुरु केली. या मंडळीने संस्कृत शाकुंतल, विक्रम चरित, मल्हाररावाचे नाटक असे नाट्यप्रयोग केले. कर्नाटकात यक्षगानाप्रमाणे पारिजात या नावाचा एक नाटक प्रकार आहे. तो प्राधान्याने संगीतमय असतो. त्यात कृष्णाच्या जीवनातले प्रसंग आणि नृत्यही असते. अशा प्रकारचं नाटक आपण मराठीत आणावं अशी अण्णासाहेबांची इच्छा होती. त्या दिशेनं त्यांनी प्रयत्न केले, पण ते कांही प्रत्यक्षात उतरलं नाही. परंतु त्या काळात हरिदास आणि नाटक मंडळीना आख्यान रचून द्यायचं त्यांचं कार्य निरंतर सुरु होतं. श्रीकृष्णपारिजात, रासक्रीडा, विक्रमचरित, हरिश्चंद्र, शुकरंभा संवाद अशी आख्याने त्यांनी संगीत नाटक पद्धतीनं लिहिली. ती सुरस, मनोरंजक असून त्यात ओवी अभंगासारखे बाळबोध धावते छंद, चालीवरील गाणी, नाना तऱ्हेच्या राग रागिणी यांचा उपयोग करून ती शक्य तेवढी गेय, आकर्षक केली. श्रीकृष्ण पारिजात मध्ये ललित गद्याचाही वापर त्यांनी केला. किर्लोस्करांच्या या काव्यांना नाट्यकविता किंवा संगीत नाट्यमालिका असं म्हटलं जातं. बेळगावच्या रामतत्व छापखान्यात १८८९ मध्ये हा संग्रह प्रसिद्धही झाला. पौराणिक विषयांवर भर असणाऱ्या अनेक नाटकांची निर्मिती किर्लोस्करांनी त्यावेळी केली. त्याशिवाय गीतलेखन, त्याला आवश्यक संगीत, जनसामान्यांची अभिरुची, नाटक मंडळी, त्यांचे आर्थिक गणित अशा अनेक गोष्टींचा अभ्यास तेव्हा त्यांनी केला. 

आपल्या कलाजीवनाला पूरक अशी नोकरी पहावी अशा विचारानं त्यांनी शाळेतली नोकरी बदलून पोलीस खात्यात काम करायला सुरुवात केली. तीही बदलून त्यांनी मग रेव्हेन्यू कमिशनरच्या खात्यात १८७८ मध्ये नोकरी मिळवली. त्या आधारे त्यांना आपलं बस्तान पुण्यात बसवणं सोपं झालं. त्याआधी बेळगावात अण्णासाहेबांच्या कंपूमध्ये कृष्णशास्त्री धोपेश्वरकर, अनंत आचमनी अशा नाट्यप्रेमी मंडळींचा समावेश होता. 

सरस्वती वाचनालयाच्या त्यावेळच्या मोकळ्या जागेत मंटप घालून या सवंगड्यांच्या संगतीनं १८७८ मध्ये अण्णासाहेबांनी शाकुंतलचा पहिला प्रयोग केला. तो प्रयोग प्रारंभावस्थेत होता, परंतु बेळगावकर मंडळीना कांही अद्भुत पहायला मिळालं हे मात्र नक्की! ‘मराठी रंगभूमीचा पूर्वरंग’ या पुस्तकात कृ. बा. मराठे यांनी अशा रंजक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या संग्रहात किर्लोस्कर कंपनीच्या नाटकाची एक जाहिरातही आहे आणि त्यामध्ये किर्लोस्कर संगीत मंडळी, बेळगाव असा उल्लेख आहे. त्याबरोबरच ‘बेळगाव समाचार’ या पत्रामध्ये आलेली जाहिरात सुद्धा वाचण्यासारखी आहे. “भरत शास्त्रोत्तेजक बेळगावकर मंडळी आम्ही सर्व बेळगावकर रसिक जनतेला या जाहिरातीने कळवितो की, वर दिलेल्या नावाची आम्ही मंडळी स्थापन करून पूर्वील कालिदास प्रभृति महान कवींनी केलेल्या नाटकांचे खेळ मराठी तयार करून प्रत्येक इंग्रजी महिन्यात पहिल्या शनिवारी आम्ही करायचे ठरविले आहे. याप्रमाणे पुढील महिन्यात ४ सप्टेंबर शनिवार रोजी रात्री कालिदास कवींनी केलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतल’चे चार अंक व ‘कच देवयानी’ पूर्वभाग अशी दोन प्रकरणे करणार आहोत. आमच्या पहिल्याच प्रयत्नात सर्वत्रांनी उत्तेजन द्यावे अशी प्रार्थना आहे...म्यानेजर” . 

याच दरम्यान आणखी एक महत्वाची व्यक्ति अण्णासाहेबांच्या संपर्कात आली आणि ती म्हणजे नाटककार गोविंद बल्लाळ देवल. १८७८ मध्ये ज्या हायस्कूलमधून ते मॅट्रिक पास झाले तिथं अण्णासाहेब किर्लोस्कर शिक्षक होते. त्यांचे काव्यगुण आणि नाट्यगुण हेरून किर्लोस्करांनी देवलांना शकुंतलेची पदे रचण्यासाठी नेमलं. सुरुवातीला शकुंतलेला पदे नव्हती. गुरु-शिष्यांची ही जोडी ‘भरत शास्त्रोत्तेजक मंडळी’त आणि पुढे ‘किर्लोस्कर मंडळी’त पदांसाठी प्रसिद्ध झाली. संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र या दोन्ही नाटकांमधल्या संगीतानं पुढं जो उत्तुंगतेचा इतिहास रचला त्याची ही अत्यंत महत्वाची बाजू लक्षात घेतली पाहिजे. मराठी संगीत नाटकाचा पाया रचणाऱ्या या थोर नाटककाराला या निमित्ते आदरांजली देऊन हे लेखन त्यांच्याच चरणी अर्पण करतो. 

नंदन हेर्लेकर 
संदर्भ ‘नाद रंग’ आर्ट्स सर्कल बेळगाव प्रकाशन

Saturday, October 4, 2025

संगीत श्रोता किसे कहे?

 

अभ्युदय

संगीत श्रोता का

 

लेखन – नंदन हेर्लेकर 

संगीत की किसी भी शाखा का अध्ययन करने से पहले अभ्यासक को एक उत्तम श्रोता बनने की आवश्यकता होती है | जो विद्यार्थी अनेक वर्षो तक अच्छा संगीत सुनने के पश्चात अपनी खुद की इच्छा के अनुसार संगीत सीखना प्रारंभ करता है, उसके मन पर सूर-लय-ताल के अच्छे संस्कार हो जाते हैं| संगीत की शिक्षा लेने के लिए आवश्यक मेहनत का प्रमाण, बुद्धि, उमर, और उसके निर्धार की कसौटी की परीक्षा हो जाती है| अर्थात एक सामान्य श्रोता की भूमिका से प्रत्यक्ष कला का आविष्कारक होने तक का उसका प्रवास बडा रोचक हो जाता है| एक सक्षम कलाकार के बनने में अनेक वर्षो की तपस्या की आवश्यकता होती है| कच्ची उम्र में संगीत शिक्षा का आरम्भ करने का फायदा तब दीखता है जब युवावस्था में ही वह मंचासीन हो जाता है|

 

जहां जहां उत्तम श्रोता है, वहां अच्छा संगीत उपजता है, फुलता है तथा उस नगर की प्रसिद्धी अल्प समय में नजदीक के क्षेत्र में होने लगती है| वहां जितना महत्व कलाकार का होता है, उतना या उससे भी अधिक अच्छे श्रोता का है| वह श्रोता भी जानकार, मर्मज्ञ और बहुत संयमशील होता है| संयमशील इसलिए कि ऐसा श्रोता एक कलाकार को उभरने के लिये पूरा समय मिलें, उसके गुणो को विकसित होने का अवसर मिलें, सटीकता से दोषो का निराकरण करनेवाले मार्गदर्शक को पूरा सहयोग मिलें, इन सारी बातों पर ध्यान देनेवाला होता है| विद्वान गुरु के समक्ष उसका ज्ञानार्जन कितनी गहनतासे हो रहा है, उसपर भी उसका ध्यान होता है| केव ऐसा श्रोता ही कलाकार की कलाप्रस्तुती का सही रसग्रहण कर सकता है|  रसिकता उसका स्थायी गुण होता है| परन्तु रसिक, जानकार, मर्मज्ञ बनने से पहले उसे केवल एक उत्सुक श्रोता होना बहुत जरुरी है|

 

वैसे देखा जाएं तो संगीत सुनने की भी एक कला है| कला का आस्वाद लेना यह उसकी अगली कडी है| आस्वाद लेते समय उस कला का तकनीकी मर्म समझने की भी जरुरत नहीं होती| सुंदरता का स्पर्श जिसको महसूस होता हो, वही रसिक कहलाता है| अभिजात हिंदुस्तानी संगीत का आस्वाद लेने की चाहत रखनेवाले को पहले सुनने की आदत होनी चाहिये|

 

पहले पहले उसे यह संभ्रम होता है कि इतने सारे लोग एक घंटे से भी अधिक समय तक चलनेवाले ‘आ....ऊ...’ जैसी आवाजों को कैसे सुनते बैठते हैं! कविता के समान एकाध शब्द को पुनरावर्तित करते हुए होनेवाले गायन को क्यों दाद देते रहते हैं? तबला बजानेवाला एक जैसा ‘बीट’ बजाते रहता है, अचानक कभी कभी जबरदस्त आवाजें तबले से निकालता है और जब सारे लोग जोरजोरसे ‘वाहवाह’ कहते हैं, उसी समय फिरसे वही पुराना धीमा ‘बीट’ बजाना शुरू कर देता है|

 

पहली बार गायन सुननेवालेको यह सबकुछ बड़ा अजीबसा लागता है| उसके मन में गूढता निर्माण हो जाती है| इस गूढता की खोज करना उसकी एक जिम्मेदारी बन जाती है| धीरेधीरे उस गूढता की पहल उसे सूझने लगती है| एकही बार जाकर शास्त्रीय संगीत सुननेवाले उस महाशय को अब फिरसे गायन सुनने की इच्छा हो जाती है| पहली बार सुनी हुई कुछ मजेदार बात उसे फिरसे शायद ही सुननेको मिलती है, परन्तु उससे भी कुछ अलग परन्तु मनको भानेवाली बात उसको आनंद देती है| कभी कभी पुन:प्रत्यय का आनंद भी मिल जाता है| उसी क्षण से उसके मनको संगीत की कुछ कुछ समझ आने की संभावना शुरू हो जाती है| पहले सुनी हुई कोई हरकत फिरसे सुनने के पश्चात उसकी समझ और सुधर जाती है, कुछ शब्दों से वह परिचित होने लगता है| हरबार उसे नयी अनुभूति हो जाती है| उसको यह समझ में आने लगता है कि शास्त्रीय संगीत ‘मोनोटोनस’ न हो कर उसमें हरक्षण नवीनता होती है, नयी नयी कल्पनाओं का सृजन उसके अंदर होते रहता है, तथा शास्त्रीय संगीत में सूर, ताल तथा प्रमाणबद्ध तरीके का चक्राकार भ्रमण होते रहता है|  

 

अब अनेक कार्यक्रम सुनने पश्चात कुछ प्रमाणित शब्द, पद्धतियाँ, तालें, स्वरनाम, रागों के नाम इन सारी बातों का परिचय उसे होने लगता है| फिर कुछ अनुभव के आधार पर महफ़िल का वर्णन वह अपने शब्दों में करने का प्रयास करने लगता है| खुद को ‘रसिक’ कहलाने में उसे आनंद मिलने लगता है| कुछ चुने हुए रागों  का भी परिचय उसे होने लगता है| सर्वसामान्य श्रोता की तरह इस अवस्था में कविता (बंदिश) का आधार लेकर ही उसे राग पहचानना संभव हो जाता है, जैसे ‘एरी आली पियाबिन’ यानि यमन, ‘कान्हा रे’ यानि केदार, ‘लंगर कांकरिया’ यानि तोड़ी, ‘जागो मोहन प्यारे’ यानि भैरव वगैरह|

 

रागदारी संगीत को समझने की यह पहली सीढ़ी है!! शब्दप्रधानत्व यह गायन कला की रीढ़ की हड्डी है| शास्त्रीय संगीत में भी शब्दबहुलता अपना महत्व रखती है| इसी के फलस्वरूप ऐसा श्रोता गायक कौन सी चीज गा रहा है, इसी बात पर ध्यान देता है, ना कि चीज कैसी गया रहा है| इसीलिए इस मनोवस्था में स्वरों का यथोक्त परिचय ना होने के कारण कोई और बंदिश की प्रस्तुती होने पर उसे राग समझने में कठिनाई हो जाती है| इस गतिविधि को हम कहेंगे कि राग का नादमय परिचय ना होना| रागों का नादमय होने के लिए ऐसे श्रोता को कुछ और इंतजार करना पड़ता है| श्रवणसातत्य के होने से स्वरों की नजदीकी समझ में आनी लगती है| स्वरों का आशय उलगने लगता है| इसके बाद ही स्वरप्रधान गायकी का मर्म उसकी अंतरशक्ति में प्रवेश करने लगता है| यही क्षण है, जब उसका ‘सुनना’ सही में प्रारंभ होता है| ‘ख्याल’ का मतलब समझ में आने लगता है| इसी अवस्था में गानेवाले के ‘ख्याल’ में वह बहने लगता है| ख्याल समझने की परिपक्वता, योग्य मनोभूमिका तैयार होने लगती है| राग का सौंदर्यतत्व समझने की आगे की सीढ़ी वह चढ़ जाता है|

 

इस अवस्था में भी उसका ध्यान सर्वपरिचित रागों की तरफ होता है| ऐसे रागों की खास स्वरपंक्ति उसके कर्णरंध्रों में भारी रहती हैं| जैसे कि बागेश्री सुनते समय वह’ ‘मपध म रे सा’ सुनने की आतुरता रखता है| ख्याल सुनने की सही आदत के कारण उसे अब कईं स्वरनाम याद होने लगते हैं| केवल आकार की आलापी से स्वर पहचान लेने की प्रगति भी हो जाती है| बंदिश को सुनकर राग पहचानने की उसकी आदत अब नष्ट होकर केवल स्वरों की पकड़ सुनने के तत्क्षण राग पहचानने तक सुधर जाती है| राग विस्तार की कल्पना अपने स्वयं के गुनगुनने तक उसकी प्रगति हो जाती है| गर आवाज अच्छी हो तो परिचित राग की सुरावटें वह खुद गाने लगता है| अबतक अनेकों का गायन सुनने के कारण उसके गुनगुनने में भी कुछ वजन आ जाता है| शब्दों का आकर्षण अधिक होने के कारण अनेकों से सुनी हुई चीजें हूबहू गाने की क्षमता उसमें आ जाती है| ‘कोठीवाले गवैयों’ जैसी उसकी भी ‘कोठीवाले श्रोता’ की प्रतिमा प्रसिद्ध होने लगती है| (एकएक राग की सैंकड़ों बंदिशें गानेवाले गवैये को एक जमाने में ‘कोठीवाले गवई’ कहा जाता था)| पुणे नगरके सुप्रसिद्ध आबासाहेब मुजूमदार, बेलगांव के देउलकर मास्टर या कुंदगोल के देसाई अण्णा जैसे गणमान्य श्रोता हरेक सुसंस्कारित नगरी में होते हैं| उनकी संगीत सुनने की अमीरी इतनी होती है, कि ‘रसिकों के राजा’ कहलानेवाले बड़े बड़े कलाकार भी ऐसे श्रोताओं के उपस्थित ना होनेपर नाराज हों| गाते समय अगर ऐसी कोई व्यक्ति महफ़िल में आ जाएं तो गाने का रंग अधिक गहरा हो जाता हों| मैंने स्वयं अनुभव किया है कि कुमार गंधर्व हों या भीमसेनजी, देउलकर मास्टर के आने तक अपना गायन भी प्रारंभ नहीं करते थे| ऐसे रसिक श्रोताओं की भी स्मरणशक्ति इतनी सूक्ष्म होती है कि बरसों बाद भी उसी दिन का समय, गाया हुआ राग और गायी हुई बंदिशें हुबहूँ वे गा कर सुनाते हैं| एक पीढ़ी ऐसी थी कि जब उनके पास ना टेप रिकार्डर था, ना कोई और सामान! परंतु बंदिशें तो सुनकर ही रट ली थीं उन्होंने!!

 

नयें कलाकारों को ऐसी व्यक्ति हमेशा आदरणीय होती है| जबही मौका मिलें, उनसे मिलने या गप्पे लगानी की वे राह देखते हैं| कोई उत्साह के साथ या कोई कुछ मानसिक दबाव में उनके सामने अपनी कला को प्रस्तुत करते हैं तथा उनकी राय जान लेते हैं| मार्गदर्शन प्राप्त कर लेते हैं| ऐसी व्यक्ति उस कलाकार का जोश बढ़ाने का काम जरूर करती है| ओंकारनाथ ठाकुर, सलामत नझाकत, बड़े गुलाम अली, छोटा गन्धर्व, अहमदजान थिरकवा, राम मराठे, अमीरखाँ, रवि शंकर, अली अकबर, यशवंतबुवा जोशी जैसे महान कलाकारों का संगीत सुने हुए श्रोता जब ऐसे युवा कलाकारों के सम्मुख अपने अनुभव बताते हैं, तब यूट्यूब से भी बढ़कर उन कलाकारों का चरित्र उनके सामने आ प्रकटता है| कभीकभी उनकी सारी विशेषताओं का प्रात्यक्षिक ऐसे बुजुर्गों से नई पीढ़ी को प्राप्त हो जाता है| हर्ष, विषाद, दुख, कारुण्य, विरह, मिलन जैसे सारे भाव गतपीढ़ी के महनीय कलाकारों के गायन के द्वारा कैसे प्रतीत होते थे, इसका सही वर्णन ऐसे बुजुर्ग श्रोताही कर सकते हैं| ‘जहाँ हमारी नजर नहीं पहुँचती, वहाँ आपका स्वर पहुंचता है’ जैसे वर्णनात्मक वाक्य भी ऐसे सम्माननीय श्रोताओं के मुख से सुनने को मिलते हैं| उनके वर्णन करने की क्षमता को देखकर सच्चे संगीतप्रेमी की आँखों में आँसु आ जाते हैं|

 

सच्चे श्रोता की मनोभूमिका को समझने के लिए हम अब अकबर के दरबार में पहुंचेंगे|

 

सम्राट का संगीतप्रेम देख कर सारे दरबारिओं का संगीतप्रेम चरमसीमा पर पहुँच गया| जो भी कोई तानसेन को देखें, ‘वाहवाह’ की बरसात करने लगा| तानसेन के स्वर लगाने से पहले ही वाहवाही की खैरात सुनकर सम्राट का क्रोध बढ़ गया| उसने हुकूम छोड़ दिया कि इसके बाद ‘वाहवाह’ करनेवाले की गर्दन उड़ाई जाएगी|

 

हर जगह समशेरधारी खड़े हो गएँ| अपूर्व शांति में तानसेन का गायन रंग भरने लगा| उसके स्वरों की नशा से मानो सारा माहौल विस्मयचकित हो गया| स्वरसम्राट तानसेन के स्वरों का भराव जैसेजैसे उत्कंठा से गूंजने लगा, तब अचानक एक कोने से ‘वाहवाह!’ सुनाई दी| समशेर उठ गई| सारा दरबार डर गया| सम्राट ने सैनिक की उठी समशेर को रोक दिया और उस दरबारी को आगे आ जाने का हुक्म दे दिया| डर के मारे कांपता हुआ वाह सबके सामने आ गया| सम्राट ने कहा, “मृत्यु को देखते हुए भी तुम्हारा सच्चा संगीतप्रेम देख कर मैं खुश हूँ| आज से तुम वहाँ पीछे नहीं, संगीत के सम्राट तानसेन के बिल्कुल सामने बैठकर गायन सुनोगे”| धन्य वह तानसेन और धन्य वह श्रोता!!

 

यह हकीकत हों या किंवदंती| असली श्रोता की मनोभूमिका स्पष्ट करनेवाली यह बात है, इसमें  कोई संदेह नहीं|  

 

लेखन - नंदन हेर्लेकर                           

Friday, May 23, 2025

राग समय के बारे में

 

संगीत श्रोतावलम्बी कला है। गायन, वादन या नर्तन की प्रस्तुति रसिकों, गुनिजनों या ज्ञानी अभ्यासकों के समक्ष हों तो कलाकार की अभिव्यक्ति में चार चाँद लग जाते हैं। ‘’स्वांत:सुखाय’’ संगीतराधना केवल रियाज़ के समय ठीक है। ऐसे भी कलाकार हैं, जिन्हे अपने रियाज़ के समय भी श्रोताओं की उपस्थिति आवश्यक लगती है। जब गुरुजन अपना रियाज़ करते हैं तब अन्य श्रोताओं के बजाय केवल शिष्यों का होना दोनों पक्षों के लिए अनुकूल होता है। वैसे संगीत की शिक्षा ‘’सीना ब सीना’’ होने की परम्परा है। गुरू-शिष्यों के सह जीवनक्रम की आवश्यकता संगीतविद्याग्रहण के साथ-साथ शिष्य के  अन्य जीवनावश्यक घटनाओं की परिपूर्णता के लिए भी महत्व रखती है। संगीत के ‘’घराना’’ या विरासत को अक्षुण्ण रखने में गुरुगृह में ही शिष्यों का निवास होना एक समय में आवश्यक हुआ करता था। आज जितनी भी गायन/वादन/नर्तन परम्पराएँ विद्यमान हैं, उनके विकास में यही सिलसिला पीढ़ी-दर-पीढ़ी चलता आ रहा है।

आज के जमाने में संगीत का जो स्तर है, उसको अनुभव करते हुए अनेक प्रश्नों का उपस्थित होना और उसका योग्य निराकरण होना जरूरी  है। आजकल का सबसे अधिक पूछा जानेवाला प्रश्न यह है कि                     

क्या शास्त्रीय संगीत का लोप हो रहा है?

इसका उत्तर ढूँढते समय एक बात को समझना होगा कि संगीत शिक्षा की परम्परा को अखण्डित रखने के लिए आजकल गुरुगृह में रहने की आवश्यकता और व्यवहार्यता नहीं है। कई प्रान्तों में सरकार के द्वारा गुरुकुल चलाए जाते हैं, उनका सारा खर्चा सरकारद्वारा उठाया जाता है, तथा रहने का और आहार व्यवस्था का भी सही प्रबन्ध किया जाता है। दुर्भाग्यवश अन्य सरकारी संस्थानों की तरह ऐसे गुरुकुलों का व्यवस्थापन भी संशय के घेरों में होता है।

अब इतना होने के बाद घरानेदार गायन-वादन की समृद्ध परम्परा क्या आज सही मार्ग से जा रही है? रागदारी संगीत की पूर्वापार सुन्दरता क्या आज भी टिकी है?

इस मुद्दे पर विचार करते समय आधुनिक अर्थव्यवस्था का विचार प्रथम सामने आता है। यद्यपि विनाशुल्क संगीत सिखानेवाले गुरुओं की आज कमी नहीं है, परंतु उनका यथोचित लाभ उठानेवाले शिष्यों की मनोधारणा में बदलाव जरूर आया है। सबसे प्रथम ज्ञानी गुरुओं का अधिक से अधिक समय का सहवास पाने के लिए शिष्य को अपने अन्य व्यवधानों को छोड़ देने की आवश्यकता होती है। आजकल की घड़ी में वह बहुत ही कठिन है।

आधुनिक काल में संगीत का अभ्यासक गुरु के मार्गदर्शन के साथ-साथ इंटरनेट का ढंग से उपयोग कर रहा है। कोरोना के कारण सामाजिक कार्यक्रमों पर बहुत सारे निर्बंध आ जाने से ऑनलाइन महफिलों की नवकल्पना सामने आ गई। अनेक प्रमाणित, सम्मानित तथा सुप्रसिद्ध कलाकारों ने अपना कलाप्रदर्शन फेसबुक लाइव तथा अन्य माध्यमों के जरिए जारी रखा। परंतु श्रोताओं की प्रत्यक्ष उपस्थिती न होने के कारण स्वयंस्फूर्ति का अभाव इसमे दिखाई दिया। ऑनलाइन उपस्थित श्रोतागण “लाइक” और अन्य “स्माइली”ओं का उपयोग करके प्रतिवचन देते हैं, अनुकूल-प्रतिकूल मत प्रदर्शित भी करते हैं। परंतु संगीत की अभिव्यक्ति पर इसका कोई परिणाम होता ही नहीं। कलाकार का रटा-रटाया आविष्कार बिना किसी जान के प्रदर्शित हो जाता है। बहुतबार फेसबुक लाइव का अर्थ भी कलाकार के ज़िंदा होने का एक प्रतीक केवल बन जाता है।

आजकल कई संस्थाओं द्वारा ऐसा संगीत प्रदर्शन “ऑनलाइन पेमेंट” के जरिए प्रस्तुत हो रहा है, जिससे कलाकारों के अर्थार्जन का मार्ग खुल गया है। यद्यपि इन महफिलों का प्रमाण कम है, कुछ कार्य आरम्भ हो चुका है, यह सत्य है।

राग समय के बारे में कुछ विचार

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत में रागों के “योग्य” समय पर गाने-बजाने के बारे में विशेष महत्व दिया गया है। इसके लिए दिन के चार तथा रात्रि के चार प्रहर, यानि आठ प्रहर के राग नियमबद्ध समयसारिणी के अनुसार समझाएँ गए हैं। इसके अलावा सन्धिप्रकाश रागों का भी विशेष वर्णन शास्त्रों में किया गया है। संगीत के अभ्यासक इस नियमावली का कठोरता से पालन करते हैं, यह बहुतांश रूप से देखा जाता है। यह समयचक्र क्या है, तथा इसका वर्णन किस तरह किया गया है इसे देखना बहुत महत्वपूर्ण है। इसी के साथ पूर्व राग और उत्तर राग क्या होते हैं, इसे भी देखना जरूरी है।

आजकल यू ट्यूब, व्हाट्सैप्प, फेसबुक जैसे लोकप्रिय समाज माध्यमों पर संगीत सुननेवालों के ग्रुप्स बन गएँ हैं, तथा दिनभर अनगिनत रागों के रेकार्डिंग्स एक-दूसरे को भेजे जाते हैं। ऐसी हालत में कोई समयानुसार रागों का श्रवण करता हो यह असंभव है। ऐसी अपेक्षा करना भी गलत है। दुर्भाग्यवश आजकल के हालात श्रोताओं के समक्ष संगीत कार्यक्रमों के न होने के हैं।

रागसमय के बंधन को ध्यान में रखते हुए अक्सर कई खास सभाओं का आयोजन किया जाता है, जहाँ केवल सुबह के सत्र होते हैं। बड़े नगरों में “दीपावली की प्रभात” होती है, जहाँ केवल भोर के समय के राग सुनने को मिलते हैं। ऐसे भी आयोजन होते हैं, जहाँ प्रभातसमय के संधिप्रकाश राग, सूरज के उगने के बाद गाए जानेवाले, तथा मध्यान्ह के समय के राग सुनने को मिलते हैं। शाम के सत्र में पूर्व सन्ध्या के समय के, शाम के संधिप्रकाश राग, सूर्यास्त के बाद वाले, रात के समयवाले तथा हो सके तो उत्तर रात्री के राग भी ऐसी सभाओं में श्रोताओं को सुनने को मिलते हैं। परन्तु आजकल समय की पाबन्दी के चलते रागसमय चक्र को सभाओं में अनुभव करना केवल नामुमकिन हो चुका है।

एक जमाना था, जब शाम को आरम्भ हुई संगीतसभा सुबह तक चलती थी। रसिक श्रोतागण बड़े पैमाने पर इसमें शरीक हुआ करते थे। रातभर सुने हुए गायन-वादन की मधुर स्मृतियाँ दूसरे दिन के अपने कार्यकलापों के साथ अपनी स्मृति में जगाकर रात को फिर दूसरी सभा में उपस्थित हुआ करते थे। फिर पूरी रात नए सुरों का मजा लेते लेते सुबह के सत्र में थकावट का नाम भी न लेते हुए बैठे रहते थे। आजकल केवल गिनेचुने संस्थानों में रात-दिन चलनेवाली संगीतसभाएँ आयोजित होती हैं, जैसे माणिकनगर का दरबार, मिरज या कुंदगोल का उत्सव।

ऐसी सभाओं में घरन्दाज गायक-वादकों के बड़ी संख्या में समाविष्ट  होने के कारण जानकार तथा गुणीजनों की उपस्थिती भी अधिक मात्रा में होती है। अप्रचलित तथा हर मेल के, आठों प्रहरों के राग सुनाने का अवसर कलाकारों को भी मिल जाता है। कई बार फर्माइशें भी पूरी हो जाने के कारण संगीत रसिक पूरी तरह तृप्त हो जाते हैं। रसिक श्रोताओं के लिए ऐसी सभाएं तीर्थस्थल बन जाती है।

इस पूरी बात का मूल है समयाधारित रागगायन। प्रातःकालीन रागों से आरम्भ करके आठों प्रहर के कुछ महत्वपूर्ण तथा लोकप्रिय रागों के नाम तथा उनका छोटा विवरण देने की यहाँ कोशिश करेंगे।

शास्त्रीय संगीत सुननेवालों के लिए तथा भारतीय संगीतशास्त्र को समझने की इच्छा रखानेवालों के लिए कुछ महत्वपूर्ण बातें बताने का प्रयास यहाँ किया गया है।

हिंदुस्तानी रागों के मुख्यत: तीन वर्ग हैं।

१ कोमल रे तथा कोमल ध वाले राग

२ शुद्ध रे तथा शुद्धा ध वाले राग

३ कोमल ग तथा कोमल नी वाले राग

पहले वर्ग के रागों को सन्धिप्रकाश के समय गाया/बजाया जाता है।  

 

 

 

प्रभात के संधिप्रकाश राग

                 

 

क्र.१ 

   

नाम

भैरव

रामकली

कालिंगड़ा  

ठाट

भैरव

भैरव

भैरव  

आवश्यक जानकारी - शुद्ध म का प्रयोग

सम्पूर्ण राग, को. रे ध, जनक, आश्रय राग   

भैरव अंग, तीव्र म तथा कोमल नी का प्रयोग

रे और ध पर आंदोलन नहीं होता  

 

 

सायंकालीन संधिप्रकाश राग

 

क्र

 

 

 

नाम

पूर्वी

पूरिया धनाश्री  

श्री

ठाट

पूर्वी  

पूर्वी

 

पूर्वी

आवश्यक जानकारी – तीव्र म का प्रयोग

दोनों म का प्रयोग, जनक, आश्रय राग   

नि रे ग से आरोह प्रारम्भ

 

सा रे म प नि आरोह   

 

 

हर नियम के अपवाद होते हैं। राग का सौंदर्यशास्त्र अलग है, तथा ठाट के नियम अलग हैं। प्रभातकालीन संधिप्रकाश रागों में तोड़ी को भी समाविष्ट किया जाता है, परंतु उसमें तीव्र म का प्रयोग होता है। उसी तरह राग भटियार भी प्रात:कालीन माना जाता है, जो मारवा ठाट का होने के कारण शुद्ध ध को महत्व देता है।

सायंकालीन संधिप्रकाश रागों में  मारवा भी समाविष्ट है, परंतु उसमें शुद्ध ध की बहुलता है। गौरी राग के भैरव तथा पूर्वी अंग के दोनों प्रकार हैं। इस शृंखला में अनेक ऐसे राग हैं, परंतु यहांपर केवल प्रचलित रागों के नाम दिए गएँ हैं।

 

शुद्ध रे ध वाले राग    

संधिप्रकाश रागों के पश्चात शुद्ध रे ध के प्रयोगवाले रागों का समय आरंभ होता है। इसमें भी सुबह तथा शाम के राग समाविष्ट हैं। सुबह के समय इस श्रेणी में बिलावल, देसकार, गौड़सारंग जैसे राग तथा शाम के समय कल्याण के प्रकार, भूपाली जैसे राग सुनने को मिलते हैं।

 

कोमल ग नी वाले राग

शुद्ध रे ध वाले रागों के पश्चात कोमल ग नी वाले रागों की बारी आ जाती है। इसमें भी दिन के तथा रात के समय के रागों को सुनने का आनंद मिलता है। साधारण तौर पर सुबह के दस से चार बजे तक तथा रात के दस से उत्तर रात्री के चार बजे तक इन रागों को सुनने को मिलता है। दिन में जौनपुरी, देसी तथा रात में बागेश्री, बहार तथा कंस के प्रकार सुनने को मिलते हैं।   

 

उत्तर राग तथा पूर्व राग

समयाधारित रागविभाजन के तत्व में रात के बारह से दिन के बारह तक तथा दिन के बारह से रात के बारह बजने तक के समय का विचार रखा गया है। रात से शुरू होकर दिन तक के रागों का वादी स्वर म प, ध नी सां इस सप्तक के उत्तरांग में होता है। उसी प्रकार दिन के बारह से शुरू होनेवाले रागों का वादी स्वर सा रे ग म प इस सप्तक के पूर्वांग में होता है। इसी कारण इन रागों को क्रमश: उत्तर राग या उत्तरांग वादी राग और पूर्व राग या पूर्वांग वादी राग कहा जाता है।

Wednesday, April 30, 2025

श्री शिवरायांचा पोवाडा

 श्री शिवरायांचा पोवाडा

रचना

नंदन हेर्लेकर 


प्रथम वंदुया भारतमाता 

आई भवानी तुळजेला

आणि गुरुजन वंदुन गातो 

मर्दुमकीच्या कवनाला 

जी जी रं जी जी रं जी जी रं जी.....


म्लेंच्छ शक्तिच्या आक्रमणाने फुटली छाती मर्दांची 

लाचारीची, नैराश्याची कशी दुर्गती देशाची

कधी मोगली कधी फिरंगी अब्रू लुटती आर्यांची

बुडे धर्मही ध्वस्त मंदिरे गणति न अत्याचाराची

जी जी रं जी जी रं जी जी रं जी....


फडकला, फडकला, भगवा झेंडा फडकला 

शिवनेरीच्या जरीपटक्याने अवघा देश चेतविला

पेटुन उठला मर्द मराठा, सह्याद्रीही सळसळला

छत्रपती शिवराजा हो ........

छत्रपती शिवराजा बनला नरसिंहाचा नव अवतार

मुजरा करुन गर्वाने गातो मर्दुमकीच्या कवनाला 

जी जी रं जी जी रं जी जी रं जी....


धैर्य नवे देशास मिळाले धार मिळे तलवारीला

मर्दांची मनगटे जाहली बळकट देशसेवेला 

शतकांचा अंधार नष्ट तो झाला उजळे सृष्टीला

शिवरायांच्या जयजयकारे स्फूर्ती मराठभूमीला

म्हणुनी आजही आम्ही गातो मर्दुमकीच्या कवनाला 

जी जी रं जी जी रं जी जी रं जी.......


Friday, April 4, 2025

साथ संगत म्हणजे काय?

 

साथ संगत म्हणजे काय?

सामान्य श्रोता गायन वादन कार्यक्रमात आवश्यक असणाऱ्या तबलासाथीबद्दल खूप औत्सुक्य बाळगून असतो. विशेष  करून तडफदार तान, दमदार आलापी, आणि भरदार स्वर असलेल्या गायनाकरिता उचित तबला साथ असावी लागते. ही ‘उचित’ तबलासाथ कशी असते हे पाहणे देखिल अत्यंत मनोरंजक ठरेल. उसळत्या समुद्राच्या लाटा काळ्याकभिन्न कातळावर धडका मारीत आहेत, असे रौद्र स्वरूप कॅनव्हासवर प्रभावीपणे चितारल्यावर अर्ध्या इंचाची अनाकर्षक पट्टी असलेली फ्रेम शोभून दिसेल का? तसेच आहे ‘उचित’ तबलासाथीचे महत्व!  

 

मुख्य गायक किंवा स्वरवाद्यवादक आणि तालवाद्यावर त्याला साथ देणाऱ्याच्या मनोमीलनाचे ते प्रत्यक्षदर्शी स्वरूप आहे. याठिकाणी तंतुवाद्याची साथ करणाऱ्या तबल्याचे स्थान पाहणेही योग्य ठरेल. सतार-सरोद यासारख्या वाद्यांमध्ये सातत्याने होत असलेली कामगत लयीच्या बरोबरीने आणि वेगवेगळ्या पटीने उमलत असताना ऐकणे हा अत्यानंदाचा भाग आहे. अभ्यासू श्रोत्याच्या मनोवृत्तीच्याही पलीकडे जाणाऱ्या या तबलियाची ग्रहणशक्ती असावी लागते.

 

तसे पाहता साथ आणि संगत हे भिन्न शब्द आहेत. साथ ही गायनाच्या, वादनाच्या लयीप्रमाणे ठेक्याची योजना करून, त्याबरहुकुम ठेका धरणे ही जर साथ मानली तर ठेक्याकडे पाहत पाहत गायन करण्याची सवय असणाऱ्या कलाकाराबरोबर तबलासाथ करणे ही तर कसरतच मानावी लागेल. तय्यार गायक-वादकांबरोबर केवळ ठेका धरून राहणाऱ्या तबलियाचे ‘पात्रत्व’ही असेच असेल. कमी ग्रहणशक्ती, कमी रियाझ, कमी कल्पनाशक्ती अशा सर्व आघाड्यांवर ‘कमी’पणा अशा तबलावादकास श्रोताभिमुख बनण्यास मारक ठरतो. प्रसंगी त्याचे हे रूप अन्य योग्य तबलावादकाच्या अनुपलब्धतेमुळे जास्तच उघडे पडते.

 

याउलट संगत करणारा तबलावादक गायन-वादन कलेचा अथांग सागर पार करू पाहणाऱ्या मनोवृत्तीचा असतो. संगीतकलेतील सर्व ज्ञात बारकावे त्याला अवगत असतात. त्यामुळे तशा तबलियाला उत्तम गुण आणि प्रचंड रियाझ असणाऱ्या गायक-वादकांबरोबर आपली कला सादर करण्यात अपार आनंद मिळत असतो. संगीतकलेचे जे अंतिम ध्येय – मोक्षप्राप्ती याकडे त्याचा त्याला नकळत प्रवास चालू असतो. असा तबलावादक कलाकार खूप मोठ्या मनाचा असावा लागतो. स्वार्थ परित्याग त्याच्या ठिकाणी वसलेला असतो. अशा प्रसंगी मुख्य गायक-वादकाबरोबरीने कलेचे अत्युच्च शिखर गाठण्याची इच्छाच त्याची प्रेरणा बनते.

 

हे झाले उत्कृष्ट कलाकारांबाबत. साधारण प्रतीच्या गायक-वादकांबरोबर त्याला कसोशीचे मनोबंधन पाळावे लागते. कित्येकदा त्याच्या स्वत:च्या प्रतिभेवर कार्यक्रम तारून न्यावा लागतो. त्याला त्यावेळी प्रथम स्थानाची अपेक्षाही नसते. मोठ्या प्रमाणावर संधी असूनही आपले प्रभुत्व तो अशा ठिकाणी प्रकट करत नाही.

 

कित्येक प्रसंगी मात्रा मोजत गाणाऱ्या, ठेक्याकडे पाहत वाजविणाऱ्या कलाकारांसोबत त्याला वाजवावे लागते, तेव्हा त्याला मनाला न पटणाऱ्या तडजोडीही कराव्या लागत असतात. याठिकाणी नेहमी ‘साथ’ करणाऱ्या तबलियाच्या अनुपलब्धतेमुळे त्याला ही भूमिका निभावून न्यावी लागत असते. पण हेही खरे आहे की अस्सलतेचा स्पर्श लाभलेल्यांची संगत त्याला कमी प्रसंगी लाभत असल्यास त्यांचा शोध घेण्यास त्याला बाहेर पडावे लागते. तशा ठिकाणी त्याच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळत जातो.

 

वर एका ठिकाणी ‘केवळ ठेका वाजवीत राहणे ही साथ’ असे म्हटले गेले आहे. या संदर्भात कांही उदाहरणावरून असे दाखविता येईल की केवळ ठेका वाजवून कांही तबलियांनी अर्थपूर्ण संगत केली आहे. हृदयातील खोलीपर्यंत स्वर पोहोचविणारे आणि एकेका स्वराला पैलुदारपणे अनेक संदर्भ देणारे गंभीररस स्वरसम्राट उस्ताद अमीरखां यांच्या संथ गायनाला लाभलेली उस्ताद महमद अहमद यांनी दिलेली तबला संगत अवश्य ऐका. याचप्रमाणे प्रश्नचिन्हांकित गायकीचे रसज्ञ पं. कुमार गंधर्व यांच्याबरोबर अधिकाधिक प्रसंगी तबलावादन केलेले पं. वसंतराव आचरेकर ही दोन उदाहरणे केवळ ठेक्याचे वजन पेलू शकणाऱ्या आणि लयीचा सखोल ठाव घेऊ पाहणाऱ्या श्रेष्ठ तबलावादकांपैकी आहेत. विलंबित झुमरा, आडा चौताल, विलंबित तीनताल असे नुसते ठेके त्यांच्या गायनाकरिता वाजविले गेले आहेत. सुदैवाने युट्युबवर किंवा रेकॉर्ड्सद्वारे आज आपण ते ऐकू शकतो.

 

सतार, सरोद, संतूर यांसारख्या तंतुवादकांबरोबरची तबलासाथ गायकीच्या साथीहून खूप वेगळी आहे. या तंतकारांच्या सादरीकरणामध्ये प्रथम आलाप, जोड व झाला असतो आणि बहुधा विलंबित तीनतालामध्ये आणि क्वचित रूपक अथवा झपतालामध्ये गत वाजविली जाते. या वाद्यांबरोबर होत असलेली तबलासाथ हा एक वेगळाच विषय आहे. गत सुरु होताच समेवर उठान घेऊन तीनचार आवर्तनाचे गत परन अथवा तत्सम जोमदार बोल तबलावादक वाजवीत असतो आणि आकर्षक रीतीने तिहाई घेऊन पेचदारपणे समेवर येत असतो. त्याच्या बहारदार वादनाने सर्वसामान्य श्रोता आनंदविभोर होऊन जातो. तोवर मुख्य तंतकार मूळ गतीचीच आवर्तने लहऱ्याप्रमाणे वाजवीत असतो. पुढे लयकारीच्या अंदाजाने बढत सुरु होते आणि सुंदर हरकती, तिहाया, चक्करदार तोडे वाजवीत वादक समेवर येतो.

 

प्रतिभावंत तबलावादक अशावेळी आपले कौशल्य, बुद्धि पणाला लावून ठेक्याला मुख्य तंतकाराच्या लयकारीशी पूरकरीतीने नटवून, सजवून, लयकारीच्या हाकेला साजेसे उत्तर देत जवाबी हरकती पेश करत असतो. पुढेपुढे द्रुत लयीमध्ये होणारे सवाल-जवाबही रंजक आणि आव्हानात्मक असतात. अभ्यासू श्रोताही अशावेळी विस्मयचकित होत असतो. समसमा संयोग साधणारे दर्जेदार कलावंत स्वत:चे स्वतंत्र विश्व निर्माण करून त्यामध्ये श्रोत्याला जाणीव-नेणिवेच्या पलीकडे नेत असतात. ऐहिक सुखाचा पूर्णपणे विसर पाडून कर्णाद्वारे स्वरांचे घटच्या घट त्यांना अतीव समाधानाचा अनुभव देत असतात.

 

पुष्कळ तबलावादकांना नेहमी असा अनुभव येत असतो की गायकाने ख्याल सुरु करताच त्याने सुचवलेला ठेका समेवर सुरु केल्यानंतर पुढे आवर्तन पूर्ण होईपर्यंत मात्रा आणि ख्यालातले शब्द यांचे माप कमी-जास्त होत असते. नंतर समेवर येत असताना काहीतरी करून सम साधण्याचे तंत्र उपयोगात आणले जाते. यात डोकावून पाहिले असता दोन गोष्टी लक्षात येतील. एक म्हणजे गायकाला ठेका अवगत असला तरी लयीचे यथायोग्य माप तबलावादकाला सांगता आलेले नसते. दुसरी गोष्ट याउलट म्हणजे तबलियाने केवळ ताल कोणता तेवढेच ऐकलेले असते आणि चीजेची लय कशी आहे ते त्याला कळलेले नसते, किंबहुना गायकाने सांगितलेल्या लयीशी त्याचे संधान साधले गेलेले नसते.

 

याबद्दल हिंदुस्तानी ख्यालगायन पद्धतींमधील काही महत्वाच्या गायनशैली अवलोकिल्या तर लक्षात येईल की कोणतीही चीज असो, गायक ख्यालाची लय साधारणपणे अति विलंबितच ठेवतात. विशेष करून धीमा एकताल या मंडळींचा आवडता ताल आहे आणि लयीचा मापदंडही ठरलेला असतो. अशा वातावरणात वाढलेल्या तबलियाला ख्यालाची साथ करीत असताना कुणाहीबरोबर त्याच लयीत सुरुवात करणे अंगवळणी पडलेले असते. गायक जर त्या लयीत सर्रास न गाणारा असेल त्याला ते अति विलंबित वजन पेलवतेच असे नाही. त्या लयीत त्याला समरस होण्यासाठी ख्यालाचा बराच काळ ओढून काढावा लागत असतो. तबलियाला अशा लयीत फार फरक करणेही सवयीचे नसते. वेगवेगळ्या लयीत वेगवेगळ्या बंदिशी असतात हे कधी त्याने लक्षात घेतलेलेच नसते. त्याला इतकेच माहित असते की ख्यालाची स्थायी, तिचा पूर्ण विस्तार, आकार-इकार इत्यादी पद्धतीने लावलेला दीर्घोच्चारित तार षड्ज आणि त्यानंतर अंतरा; अशी पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर केवळ समेवर येणारा शब्दोच्चार , मग शक्य तेवढा अंतऱ्याचा विस्तार करून अंतरा पूर्ण म्हणून झाल्यावर स्थायीचा पुनरुच्चार केल्याबरोबर प्रचलित विलंबित लयीची गाणाऱ्याला न विचारताच बरोबर दुगुन करणे. यांत्रिकपणे त्याचा हा व्यवहार त्याच्या अंगवळणी पडून गेलेला असतो. अशा तबलियाच्या मनातील ख्यालाचे तयार झालेले प्रतिबिंब अगदी कधीतरी बदलते. त्यामुळे अशा लयीची सवय नसलेला गायक प्रारंभी दर्शविल्याप्रमाणे मोहरून गाऊ शकत नाही.

वर विस्ताराने दाखवलेली ही वादनशैली काही ठराविक भागातच आहे असे नाही. अखिल हिंदुस्तानात सर्व तऱ्हेची गायकी एकच शहरात ऐकायला मिळेल अशी खूप कमी ठिकाणे आहेत. ज्यावेळी वेगवेगळ्या शैलींच्या गायक-वादकांबरोबर तबलावादक आपला ताळेबंद जमवेल त्यावेळी त्याची नजर चौफेर होऊन ज्याला जशी लय हवी तशी तो देऊ शकेल.

 

आज तबला शिकवणारे वर्ग प्रत्येक शहरात अमाप आहेत. केवळ कलेवर गुजराण करणाऱ्यांचे ‘बरे दिवस’ आले आहेत असे समाधानाने म्हणण्यास काही हरकत नाही. या गुरुमंडळीनी कायदे, रेले, परण, तोडे, चक्रदार गती आणि द्रुतलयीतल्या दमदार-बेदम बंदिशी शिकवतच विलंबित गायन, मध्यलयीतले ख्याल, जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर आदि गायकीची खास वैशिष्ट्ये समजावून, त्यांना साजेसे ठेके विद्यार्थ्यांकडून संयमाने करवून घेतले पाहिजेत. भरपूर गायन-वादन ऐकवले पाहिजे. रोजच्या बैठकीतच ख्यालाची साथसंगत करण्याचे प्रत्यक्ष धडे दिले पाहिजेत. संगीत संमेलनामध्ये हजेरी लावून ऐकण्याची सक्ती केली पाहिजे. यातूनच मैफिलीचे कलाकार घडणार आहेत हे स्पष्ट आहे.   

 

नंदन हेर्लेकर