Pages In This Blog

Monday, February 8, 2021

शास्त्रीय संगीत काल, आज आणि उद्या

  शास्त्रीय संगीत काल, आज आणि उद्या

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबद्दल बोलत असताना वरील वाक्याचा नेहमीच उपयोग होत आला आहे. या विचारामागे अनेकजणांची प्रतिक्रिया चिंतादर्शक स्वरूपाचीच असते. या अनेकजणात संगीताचे खरे रसिक असतात, कलाकार असतात, कलेचे जाणकार आणि अभ्यासकही असतात. शिवाय त्यांनी संगीताचा सुवर्णकाळ पाहिलेला असतो. संगीतकलेतील महान उपासकांचे जीवन, त्यांची जडण घडण आणि उत्कर्ष त्यांनी पाहिलेला असतो. अर्थात यातली श्रीमंती दर पिढीनंतर बदलत असते. त्यातले आदर्श बदलत जातात. महानतेचे मानदंड सुद्धा बदलत जातात. परंतु कलेचे असामान्यत्व जाणणारे असे या समूहातले लोक असतात. आज ज्यांची नावे या क्षेत्रात उत्तुंगतेच्या शिखरावर आहेत त्यांचे गुरुजन अशा लोकांच्या स्मरणात असतात.     

तसे पाहता असे वाक्य उच्चारून सामान्य लोकांसमोर संगीत सृष्टीचे एक वेगळे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करणारेही लोक अधिक असतात. अशा लोकांसमोर केवळ त्यांच्या पिढीतल्या श्रेष्ठ कलाकारांची नावे असतात. परंतु अशा लोकांचे शास्त्रीय संगीताचे ज्ञान वाखणण्यासारखे असते असेही नाही. यामध्ये तथाकथित समाजसेवक, आश्रयदाते, लेखक, पत्रकार, विविध पक्षनेते, पुढारी वगैरे लोक असतात, ज्यांना निरनिराळ्या प्रसंगी जाहीर वक्तव्य करावे लागते. अशा लोकांच्या संभाषणामध्ये हा विषय प्राधान्यतेने येत असतो. याचा अर्थ ही त्यांची मते अधिकृत किंवा अभ्यासपूर्ण असतात असेही मानण्याचे कारण नाही.

संगीताच्या अभ्यासकाला हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्याच्यासमोर आपण स्वतः केलेल्या अभ्यासाचा, महान गुरूंकडून अथकपणे मिळवलेल्या ज्ञानसंपदेचा, अन्य सहकारी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचा, मिळालेल्या मार्गदर्शनाचा, त्याचप्रमाणे या सर्वांच्या आदर्श गुरुजनांच्या विद्वत्तेचा दृष्टीकोण असतो. एखाद्या रागाचा सर्वांगीण विस्तार करत असताना या विद्वान कलाकारांनी त्याकडे किती विशाल दृष्टी ठेवून पाहिले आणि त्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये किती विविधता होती हे सर्व या अभ्यासकाच्या डोळ्यासमोर तरळून जाते. जसे कुमारजी म्हणत, रागाकडे समोरून, पाठीमागून, डावीकडून, उजवीकडून एवढेच काय तर वरूनसुद्धा पाहता आले पाहिजे. एकाच प्रकारे गायन करणे हा केवळ पीठ दळण्याचा प्रकार आहे. याला परंपरा, घराणे जपणे वगैरे म्हणत असतील तर ती एक भली मोठी चूक आहे.

अर्थात कुमारजी हे अत्यंत वेगळा विचार घेऊन श्रोत्यांसमोर आलेले सतत चिंतनशील असे गायक होते. इतरांना त्यांच्या त्या मनोवृत्तीशी जोडता कामा नये. किंबहुना आपल्या शिष्यांनी आपल्यासारखेच गावे, आपलेही घराणे निर्माण व्हावे अशी त्यांची मुळीच अपेक्षा नव्हती. उलट याच गोष्टीची त्यांना घृणा होती.

कुमारजींच्या उदाहरणावरून इथे एवढेच सांगायचे आहे की घराणे आणि परंपरेच्या पिढीजात साखळीने अनेक शतके कित्येक पठडया जोपासल्या गेल्या. त्या प्रत्येकाच्या नजरेच्या स्वातंत्र्याने सुंदरतेचे वेगवेगळे परिमाण जोपासले जाऊन सुसंस्कृत समाजाची ओळख निर्माण झाली. प्रत्येक घराण्यागणिक शेकडो गुणी कलाकार होऊन गेले आणि शिष्यांची अतूट शृंखला निर्माण झाली. त्यातून उत्तमतेची श्रवणकलासुद्धा विकास पावली. संगीताचे शास्त्र लोकांना कळू लागले, त्याशिवाय संगीताचे सौंदर्यशास्त्रसुद्धा निर्माण झाले. संगीत कसे ऐकावे याचाही विचार पुढे आला. सर्वात महत्वाचे म्हणजे संगीतकलेपासून होणारे शारीरिक, मानसिक फायदे या गोष्टींचाही ऊहापोह सुरू झाला. उत्तम संगीतामुळे मनुष्यासह प्राणी, वनस्पती आणि सामाजिक समूहजीवनावर होणार्‍या सुपरिणामांचेही शास्त्र पुढे आले.

आजचे शास्त्रीय संगीत हे अशा रीतीने शास्त्रीय (सायंटिफिक) विचार करणार्‍या, संगणकीय मेंदूने विचार करणार्‍या पिढीचे आहे. ह्या दृष्टीने विचार केला तर उद्याचे संगीत हे डिजिटल युगाला शोभणारे आणि नव्या उपकरणांचे सहाय्य घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करू पाहणार्‍यांचे आहे. यात अनवट वयातल्या मुलांनी जुनाट ख्यालाची नवी तंत्रे शोधून बुजुर्ग घरंदाज कलाकारांना नवे पाठ दिले तर काही आश्चर्य वाटायला नको.       

 

नंदन हेर्लेकर 

Sunday, January 24, 2021

स्वरादित्याचे आवर्तन स्तब्ध !!!

 स्वरादित्याचे आवर्तन स्तब्ध 

हा लेख भारतरत्न पंडित भीमसेनजी गेले तेव्हा बेळगावच्या ''तरुण भारत'' मध्ये लिहिला होता. 

मला वाटते 'त्या' दिवसाच्या या लिखाणाच्या प्रयोजनामध्ये आणि आजच्या घडीला हे पुनः प्रसिद्ध करण्याच्या प्रयोजनामध्ये तसा काहीच फरक नाही आहे.   

             हिंदुस्थानी संगीताचा तळपता सूर्य असे ज्यांचे थोड्याच शब्दात वर्णन करता येईल असे "खरोखरीचे" भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान अवघ्या संगीत सृष्टीला मोठाच हादरा देणारे आहे. वयाची सरणारी पाने उलगडत असताही त्यांचा हिशेब न ठेवणारे हे असामान्य व्यक्तिमत्व वयाच्या ८६व्या वर्षांपर्यंत अखंडितपणे गात राहिले. 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' हा एकात्मतेचा संदेश दूरदर्शन च्या माध्यमातून त्यांनी दिला. त्याहीपूर्वी अनंत काळापासून स्वरधारेच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गौरवशाली भारतीय संगीताच्या महान चक्रवर्तीचा वारसा त्यांनी आपल्या स्वरशक्तीने त्रिलोकात गर्जविता ठेवला. भीमसेन या नावाला शोभेल अशी त्यांची स्वर शक्ती होती. 'भाव भक्ती भीमा उदक से वाहे' ही पंक्ती म्हणत असताना त्यांच्या उच्चारण शक्तीमुळे स्वर शक्तीही उत्तुन्गतेचे शिखर गाठायची. त्यांचा 'षडज' सप्तस्वरांची उत्पत्ती करून देण्याच्या आपल्या व्याख्येपलीकडे जाणारी एक अमोघ प्रवृत्ती होती. घरंदाजी गायकीचा रसपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या स्वरविलासामुळे 'किराना' परंपरेच्या अत्युच्च शिखरावर पोचला.




              तसे पाहता त्यांच्यावर बालपणी असलेला उ. अब्दुल करीम खान साहेबांच्या गायकीचा प्रभाव सवाई गंधर्वांच्या कडून मिळालेल्या तालमीतून अधिक प्रखर झाला. त्यांची विलम्पत ही किराना घराण्याच्या सर्व बारकाईचा ठाव घेणारी होती. पण गगनाचा ठाव घेणाऱ्या अतितार स्वरावरील फिरत, विद्युल्लतेच्या वेगाने तिन्ही सप्तकांतून अविरत कोसळणारी त्यांची 'भीमसेनी' तान आणि मध्य लयीच्या पाच-पाच आवर्तनांची त्यांची न थांबलेली तानक्रिया हे सारे किराना परंपरेत कुठेही न दिसणारे त्यांचे स्वतःचे धन होते. अशा अजस्र तानक्रियेत त्यांचा श्वास 'नेमका' कुठे येतो हे अचंबित श्रोत्या पुढचे मोठेच प्रश्नचिन्ह असे.
              वैदिक काळखंडामध्ये 'आसेतु हिमाचल' भारतीय संगीत शास्त्र वैभवाप्रत गेले. भरत, कश्यप, मातंग अशा महा मुनिपासून कोहल, दत्तील, वेण, नान्यभूपाल, भोज, सोमेश, अभिनव गुप्त, लोल्लत, उद्भट, शारंगदेव असे महान शास्त्रकार संगीतशास्त्राचा परमोद्धार करून गेले. संगीतशास्त्राला देवत्व प्राप्त झाले. ते भक्तिमार्गाचे मोठेच साधन बनले. पण बाराव्या शतकानंतर  संगीताची कांही दृष्ट्या अधोगती सुरु झाली. शास्त्राचा ह्रास होऊ लागला. संगीताचे देवस्थान नष्ट झाले. कला राज घराणी आणि सरदार-दरक्दारांची बटिक बनली. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत ही  स्थिती अशीच राहिली. कलावंत व्यसनी, रंगीले, लहरी आणि व्यावहारिकदृष्ट्या कफल्लक राहिले, परमोच्च संगीतगुण असणारे ज्ञानी गुरु शास्त्र विसरले. अशा काळात कलेला आणि शास्त्राला पुनर्वैभव प्राप्त करून दिले ते 'विष्णू द्वयानी', म्हणजेच विष्णू नारायण भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी. संगीताचे नवे युग सुरु झाले. 

              याच काळात पं. भीमसेन जोशींच्या रूपाने एक ध्रुव तारा अवतीर्ण झाला. त्यांचे स्थान केवळ प्रसिद्ध गवई म्हणून नव्हे तर मैफिलीच्या बाबतीत एकमेवाद्वितीय स्वरनायक म्हणून त्यांची ख्याती देश-विदेशात झाली. सहा-सहा महिने त्यांचे advance बुकिंग नेहमीच असे. आजच्या काळात ज्याला 'लीजींड' म्हणता येईल असे हे चिरतरुण व्यक्तिमत्व होते. भाषा, प्रांत, देश, धर्म, समाज रूढी आणि सर्व तथाकथित राजकीय, आंतरराष्ट्रीय बंधने या सर्व मर्यादा पार करून सात समुद्रपार गेलेले हे अस व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. कंठात अक्षय स्वरांचा खजिना साठवलेला आणि उत्कंठीत श्रोत्यांच्या तना-मनावर उदारपणे उधळलेला तो एका अजब चमत्कार होता. त्यांचे गायन ऐकून बाळांचे तरुण आणि तरुणांचे वृद्ध झालेले श्रोते लक्षावधी असतील. पण त्यांचे स्वरदेणे कधीच विद्ध झाले नाही.
                      त्यांची कोणतीच मैफल कधीच म्लान झाली नाही हा ही एक चमत्कारच. त्यांच्यावर अनेकांनी अनेकवेळा सातत्याने स्तुतिसुमने उधळली. अनेकांनी टीकाही केल्या. त्यामुळे त्यांचे कधी अडले नाही व कधी ते फुशारकीने हुरळूनही गेले नाहीत. 'आज मूड लागत नाहीचाही त्यांनी कधी आधार घेतल्याचे ऐकिवात नाही.

त्यांचा संचार आणि संपर्क अफाट होता. त्या संपर्काला त्यांच्यातील देवत्वाचा स्पर्श होता. त्यामुळेच त्यांच्यातील सघटन कौशल्य सवाई गंधर्व संगीतोत्सावाच्या आयोजनात दिसले. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या श्रोत्यांमध्ये त्यांच्या प्रभावळीचा दरारा असे. आयोजनात कुठेही ढिसाळपणा नसे  व तक्रारीला जागा नसे. आज जागोजागी होणारी संगीत संमेलने ते उदाहरण समोर ठेवूनच आयोजिली जातात. त्याहून पुढे जाऊन म्हणायचे तर 'सवाई गंधर्व महोत्सवात गायला मिळावे' ही उत्कट प्रेरणा नवकलाकाराच्या मनी यावी असे ते महा मेळ्याचे स्वरूप केवळ त्यांच्यामुळेच बनले. 'हिंदुस्थानी संगीतात मुसलमानी कलावंतांचे वर्चस्व आहेअसे म्हणत असतानाच "हिन्दुओ में क्या, मुसलामानो में भी ऐसा गवय्या नही है" असे उद्गार काही ठराविकच गवयासाठी मोठमोठ्या उस्तादांनी काढले. आजच्या काळात भीमसेनजींचे नाव त्या यादीत अग्रस्थानीच होते. 

            गायकी आणि  नायकी या दोन्हीमध्ये त्यांचे संगीतमूल्य अतिश्रेष्ठच होते. संगीतनिर्मितीही त्यांनी केली. 'धन्य ते गायनी कला' यासारख्या नाटकांना त्यांनी दिलेल्या चाली घरंदाजी गायनाचा परिचय करून देणाऱ्या आहेत. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' हे गीत 'मारवा' समजण्यासाठीचे एक उत्कट पण अवघड उदाहरण आहे. मराठी संतवाणीकन्नड दासरपदगळू ही तर प्रसिद्ध आहेतच, पण त्यांनी गायिलेली कबिरांची, तुलसीदासांची, ब्रह्मानंदाची तसेच अनेक नवीन कवींची हिंदी पडे न मोजता येण्याइतकी आहेत. लता मंगेशकरांसह म्हटलेली पं. नरेंद्र शर्मांची त्यांची हिंदी पदे अतिशय लोकप्रिय आहेत.
            पंडित भीमसेन जोशी हे नाव संगीतकलेच्या भाव विश्वात नित्यच राहील. संगीतात रमणाऱ्या, त्या अमर्याद सुरसागरात आत्मानंद मिळवू पाहणाऱ्या रसिकांना हे प्रातः स्मरणीय राहील, पिढ्यानपिढ्या ही स्वरनौका संत्रस्त जनांना सुखवीत राहील, स्वरमयी कलावंतास प्रेरक राहील.


नंदन हेर्लेकर

Thursday, January 14, 2021

LET ME SERVE YOU BETTER

 LET ME SERVE YOU BETTER

DEAR READERS AND VIEWERS 

YOU CAN PUT DOWN YOUR QUERIES, DOUBTS OR SUGGESTIONS IN THE COMMENTS SECTION UNDER ANY ARTICLE.

MUSIC IS UNFATHOMABLE. YOU MAY SEE THE UNSEEN, WHICH I MIGHT MISS TO OBSERVE.

WITH YOUR VIEWS AND CONTRIBUTIONS THIS BLOG WILL BECOME A TREASURE OF KNOWLEDGE. 


Thursday, January 7, 2021

SOME INTERESTING FACTS ABOUT INDIAN MUSIC

 

SOME INTERESTING FACTS ABOUT INDIAN MUSIC

 

It is said that……..

 

At approximately 4500 BC Indian musical notes were only 3. They were called (sung) as “Aarchik” (आर्चिक), “Geetik” (गीतिक) or “Gaathik” (गाथिक) and “Saamik” (सामिक)

 

During 2500 -1400 BC this number increased and the added notes were named as “Swaraantar” स्वरान्तर, “Odava” ओडव, “Shaadav” षाडव  and “Sampoorna” सम्पूर्ण

 

“ Ma Ga Re Sa Ni Dha Pa” was the way of singnig. It was “Maargi Sangeet” based on “Saam Gayan”.

 

During 1500 – 500 BC “Graam Gana” was popular and the Ragas like “Haripriya”, “Kamboji” and “Bhairav” took their shape.

 

The musical path followed was based on “Naaradi Shiksha”.

 

Cronologically, after “Saam Gayan” the styles followed were -

“Gaandharva Gaan”

“Maargi Gaan” and then

“Desi”

 

The earlier authors were -

Bharat, Kohal, Dattil and Naarad.

(At different times there were different Naarads, since the texts owed to them are written at different periods.)

 

The earlier texts were –

Naatya Shastra, Sangeet Meru, Dattilam, Naaradi Shiksha, Naaradeeyam, Swararnava and Naarad Samhita.

It was during 9th century AD, Matang established “SHADJA GRAAM” and “MADHYAM GRAAM” in the text Brihaddesi.  In 11th century AD, the text Sangeet Makarand was written and 6 ‘male’ Ragas, their ‘spouses’, and their ‘children’ Ragas were elaborated in it. The author was Naarad 2, who found out 93 Ragas.

During 11th to 13th centuries some more important texts were published. They were –

Sangeet Samayasaar by Paarshvadeva, Sangeet Saar by Vidyaranya and Sangeet Ratnaakar by Sharangdeva.

In 1550 Rama Amatya wrote Swaramela Kalanidhi and he established “Mukhari” as Shudh Mela. During this period the texts published were –

Sangeet Darpan, Raga Tarangini, Raga Vibodh and Sangeet Sudha. Sangeet Sudha was written in 17th century by Govind Dixit, the father of celebrated Pandit Venkatmakhi.

“Janak-Janya theory was established during this time. Venkatmakhi is known for his book Chaturdandi Prakashika and 10 main points he mentioned in that are –

Veena, Shruti, Swar, Mela, Raga, Aalap, Thaay, Geet, Prabandh and Taal. He also elaborated Shadja and Madhyama Graam.

The next important text during the 18th century was Sangeet Saraamrit by Raja Tulajaji Bhosle (1729-35). He explained about Naad, Shruti, Swar, Graam, Jaati, Taan, Raga, Geeti, Vadya, Prabandh, Taal and Natya.

 

Graam-Moorchhana-Jaati was the system of elaboration during ancient times. Then Raga-Ragini was a popular way to describe the Ragas. There were four accepted principles known as Shiv Mat, Bharat Mat, Kallinath Mat and Hanumat Mat. Raga, Ragini, Putra and Putravadhu system was the most accepted theory of classification.

 

The trinity of Carnatic music is

Pandit Shyamashastri (1762-1827)

Pandit Thyagaraj (1767-1847)

Pandit Muthuswami Dixit (1776-1835)

 

How was Carnatic music before the trinity?

 “Graam Geya Gaan” (For the common people)

“Aranya Geya Gaan” (For the people in the hermitage, forest dwellers)

 “Utta Gaan (Deep music) (For the Yagnas)

 

Carnatic music from 8th century

 The most notable personalities from this period are –

 Nayanmaar Alwars, Narayan Teerth, Sadashiv Brahmendra, Purandardas, Haridas,, Annammacharya (1408-1503), Bhadrachala Ramdas, Guru Shanta Kopayati (36000 poems), Haridasas – Narahari Teerth, Shripadraj, Vyasaraj, Vaadiraj

Kanakdas, Vijayadas, Gopaldas, Jagannathdas (1484-1564), Vyasaraya’s Shishya.

Kshetradnya (17th century, Bhakti), (14200 Telugu composotions), Narayan Teerth (16th or 17th century Shrikrishna Leela Tarangini), Bhadrachala Ramdas (17th century, impression of Kabir), Sadashiv Brahmendra (17th century), Param Shivendra Saraswati, the Shishya of the Shankaracharya of Kanchi.

When we talk of modern musicians, theorists and scientists, there are some most important names to be mentioned.

Muthuswamy Dixit lived in Benares. Born and raised in the south, he learnt and then absorbed Hindustani Ragas Hamir Kalyani, Yamuna Kalyani, Vrindavan Sarang, Dvijavanti etc. into Carnatic style. Behag, Desh, Piloo, Madhuvanti, Darbari Kanhada, Dhanshri, Tilang Ragas got their place in Carnatic music from the north by his contribution.

Muthuthandavara (1560-1640), Marumutha Pillai (1712-1787), Arunachal Kaviyar (1711-1778), Otukadu Venkat Kavi (early 18th century), Pichimiriyam Adiyappa (17th or 18th century), Pallavi Gopal Aiyar (17 or 18th), Matrubhutayya (18th century), Margadarshi Shesh Aiyangar (17th century), Ghanam Simayya (1659-1682), Griraj Kavi (1684-1710), Ramaswamy Dixitar, Papavinas Mudliar (18th century), Margadarshi Veerabhadrayya (1741-65), Vijaya Gopal Swami, Mertur Venkat Raman Sastri, Swathi Thirunal are some of the well known names.

 Recent noted composers were Vidwan Lalgudi Jairaman and 

Vidwan Bala Murali Krishna.

Thursday, December 31, 2020

"SOMETHING ABOUT NATRAJ"

DATTATREYA

On 29th of December Indians celebrated DATTA JAYANTI. Dattatreya has three heads. The holy trinity is "BRHAMA", "VISHNU" and "MAHESH". One creates, another protects and the third one destructs. 

SHIVA

Shiva is known to destruct the unwanted from the earth. The Hindu Puraanas describe the "LEELAS" of Shiva. Here I am not writing about it. I wish to write something about NATRAJA, the dancing form of Shiva.

About Natraj

According to Hindu philosophical thought, Shiva is the first dancer. His name Natraj means the lord of dances and action and his dance in the hall of Chidambaram is the symbolisation of all movement within the cosmos in order to release humanity from the snares of illusion. The dance is in reality a manifestation of his five activities viz. Srishti (creation), Tirobhava (embodiment of the soul and rest) and Anugraha (release and salvation) representing respectively the activities of Brahma, Vishnu, Mahesh and Sadashiva. Creation arises from the dram protection proceeds from the hand of hope, from fire proceeds destruction, the foot held aloft gives release (Coomarswamy) We are also familier with Krishna and Radha, the eternal lovers, as dancing gods and goddess while Shiva is Natraj, Krishna is known as Natwar, who is the embodiment of spiritual love leading of the individual soul (Jitatma) to join the Divine soul (Paramatma), represented by Krishna.

Brahma was approached by Bharat. At the time of Shiva’s dance, I have seen his graceful style (Kaishiki) appropriate to the exotic sentiments and this is endowed with gentle Agraharas (dance sequences and has sentiments and states Rasa and Bhavas) and action as its soul. This style can not be practiced properly by man except with the help of women. Then Brahma created from his mind nymphs (Apsaras) who were skillful in embellishing the drama.

Where the hand moves, there the eyes follow, where the eyes go, the mind follows, where the mind goes, the mood follows and where the mood goes, there the flavour arises.

(Derived)

 



Monday, November 23, 2020

ADHYATMA AND SANGEET (In Marathi)

 

अध्यात्म आणि संगीत

लेखन – नंदन हेर्लेकर

 

संगीत हे तीन शाखांनी बनलेले आहे. गायन, वादन आणि नर्तन या त्या तीन शाखा. स्वर, लय आणि ताल या तीन गोष्टींनी युक्त अशी ती मन मुग्ध करणारी कला आहे. खरे संगीत या तीन तरल गोष्टींवरच आधारलेले असते. घनगंभीर तानपुर्‍याच्या स्वरावर्तांमधून ऐकू येणारा “सा” कलाकाराच्या उन्मेशी भावसंपुटाला स्पर्श करतो आणि तेव्हाच त्याच्या अंत:करणातील स्पंदने उसळी घेऊ लागतात. पाहता पाहता अमूर्त विश्व साकार होऊ लागते. त्याच्या समोर असलेल्या भावोत्सुक रसिकालाही “तो” स्पर्श होऊन त्याचेही मन ओले व्हायला लागते. षडजाच्या आळवणींनंतर प्रेरणा देणारे पुढचे सुर एखाद्या रागाच्या आराधनेत कलाकाराला गुंगवून टाकतात आणि एकतानते ची एरवी अशक्य असलेली अवस्था त्याला आपसूकच प्राप्त होऊन जाते.

आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे संगीताचा मूळ मार्ग “मोक्षमार्गम निगच्छ्ति” असा दिला गेला आहे. त्यागराजासहित सर्वच पूर्वसूरी संगीताला  “नादयोग” असे म्हणतात. भगवद्गीतेत “वेदानाम सामवेदोस्मि” हा थोरपणा श्रीकृष्णांनीच संगीताला दिला आहे. धर्मार्थ काम मोक्षाणामिदमेवैक साधनम” असे संगीताचे महत्व “संगीतरत्नाकर” या ग्रंथात शारंगदेवाने लिहून ठेवले आहे. आजचे काही योगगुरू ओंकाराचे उच्चारमाहात्म्य सांगत असताना इलेक्ट्रोनिक तानपुरा वाजता ठेवूनच प्रात्यक्षिक देत असतात.

या सर्व विवरणावरून संगीत हे अध्यात्माच्या किती निकट आहे हे स्पष्ट होते. आता या ठिकाणी “अध्यात्म” हे नेमके काय असते याचाही विचार हवा. सर्वसाधारणपणे अध्यात्माचा आपल्याकडे अत्यंत वरवर अर्थ घेण्याची प्रवृत्ति   असते. त्याचा संबंध सरळ “धर्मा”शी जोडून दिला जातो. आत्यंतिक  भक्तिभाव हा अध्यात्माशी संलग्न असतो, असेही संगितले जाते.

 

 

 

 

प्रत्यक्षात धर्म, पूजापाठ, कर्मकांड या सर्वांशी अध्यात्माचा काहीही संबंध नाही.

 

अध्यात्म ही कोण्या एका धर्माची मिरासदारीसुद्धा नाहीये. “आपल्याला माहीत नसलेली गोष्ट समजून घेणे” या माणसाच्या “निरागस” आणि “मूलभूत” प्रवृत्तीच्या जवळ जाणारी ती एक “सहज” प्रक्रिया आहे. आता याला “निरागस” का म्हणावे, तर आपल्याला एखाद्या बालकाच्या “सहज” कुतुहुला कडे पहावे लागेल. एखाद्या अनोळखी गोष्टीकडे पाहून “याला काय म्हणतात?” असा बाळबोध प्रश्न विचारण्याच्या अवस्थेत याचे मूळ आहे. ही निरागसता ज्याच्याकडे नेहमी जिवंत असते तो “अध्यात्म जगतो” असे खुशाल समजायला हरकत नाही. कोणतीही गोष्ट जाणून घेणे, त्याचा अर्थ लावणे आणि त्या अर्थाला आपल्या जगण्याशी जोडून देणे हेच अध्यात्म आहे. ज्याचे कुतुहुल टिकून राहते त्याचे ज्ञान वाढते. नवनवे ज्ञानकण मनाच्या गाभार्‍यात साठवून ठेवून पुढे त्याची व्याप्ती अधिक वाढवणे हे त्याचे आद्यकर्तव्य ठरून  जाते. यावरून एखादा नास्तिकसुद्धा उत्कट अध्यात्म जगणारा असतो हे मानण्यास हरकत नाही.

आयुष्याची ही इतिकर्तव्यता प्रबुद्धतेने जो जाणतो, तो सार्थक जीवन जगणारा “योगी” असतो. या योग्याला अर्थातच योग्य वयात योग्य गुरु लाभणे महत्वाचे असते. तोही एक “योगायोग” असतो. कित्येकदा ज्ञानी गुरु योग्य शिष्याच्या शोधात असतात. “साधवोहि न सर्वत्र” या उक्तीप्रमाणे गुरु शोधून काढणे हे सुद्धा जिकिरीचे काम असते. यासाठीच संगीतामध्ये “पानी पिये छान के, गुरु बनाए जान के” ही उक्ति प्रसिद्ध आहे. ज्ञानसंपदा वाढवण्याची प्रेरणा देणारा गुरु ज्याचा बळकट, त्याचे अवघे जीवनच कारणी लागते. “ज्ञानी” गुरु क्वचित लाभतात. कुतुहुल कायम ठेवणारा शिष्यही क्वचित असतो.

अध्यात्माच्या अंतरंगात शिरत असताना “कोहं” म्हणजेच मी कोण? आणि “सोहं” म्हणजे मी “तो”च आहे, अर्थात आत्मा आहे, शरीर आणि प्राण म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचा समन्वय “सोहं” या शब्दात आहे, असे   बरेच काही सांगितले जाते. “अहं ब्रह्मास्मि” असे वेदांती अनेकवेळा सांगत  असतात. “तत्वमसि” या महावाक्याचा अर्थ अनेक संत-महंतांनी आपापल्या परीने सांगितला आहे. म्हणजे “तूच ब्रह्म आहेस” असे सांगताना शिष्यातल्या “स्व” ला जागृत करण्याचे महाकार्य गुरुमंडळींनी केले. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” असे सांगणारे अक्कलकोट स्वामी किंवा “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असे सांगणारे सद्गुरू वामनराव पै हे सर्वच थोर पुरुष आपल्या शिष्याने आपला “स्व” ओळखून जीवन धन्य करून घ्यावे अशा वृत्तीने उपदेश करणारे होते. यातला “मी” जपणे आणि “मी”पणाचा त्याग करणे हेही मोठे तत्व अध्यात्माचे उपासक सांगत असतात.

संगीतात दुसरे असते तरी काय? ज्या क्षणी गुरु तानपुरा जुळवून शिष्याच्या हाती देतो त्याच क्षणी त्या दोघांचा “शरीर आणि आत्मा” यांचा समन्वय सुरू झालेला असतो. त्यानंतर प्रारंभ होणारे स्वरांचे शिक्षण हे एका अमूर्त तत्वाचे मार्गचलन असते. अमूर्त एवढ्याचसाठी की कोणत्याही रागाची “बैठक” ही केवळ श्रुतींच्या सामर्थ्यावर निर्धारित झालेली असते. ती दिसत कधीच नसते. तिचे असणे केवळ शिष्याच्या समजण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ती क्षमता वाढण्याच्या काळातच एका सुखद क्षणी तो गुरु म्हणतो “तत्वमसि!!” या ठिकाणी “श्रुति” द्व्यर्थी आहे. एका अर्थी शिकण्यास आवश्यक आणि योग्य असा “कान” महत्वाचा, तर दुसर्‍या अर्थी दोन स्वरांमधील सूक्ष्मान्तर उमजण्याची पात्रता. “सा” हा कधीही स्वयंभू असतो, पण त्याची आराधना करणारा प्रत्येकजण मात्र आपली स्वतंत्र दृष्टी मिळवून आपली वाट आगळी वेगळी कशी होईल याचा ध्यास घेत असतो.  

असेच काहीसे असते संगीतातले अध्यात्म. 

प्रथम सांगितल्या प्रमाणे स्वर, लय आणि ताल या तीन तरल गोष्टींवरच आधारलेले संगीत जेव्हा शब्दांचा संग धरते तेव्हा “अत्युत्कट” आणि “अमूर्त” पातळीपेक्षा वेगळे आणि समावेशक असे त्याचे रूप बनते. आजचे ख्याल गायन असो व वाद्यवादन. एकाने एकाचवेळी स्वानंद घेणे हा उद्देश यात असतो. श्रोतेही त्याच्या आनंदात सहभागी होतात हा त्याचा दुसरा भाग झाला. प्राचीन काळातले गुरुकुलातले ऋचांचे गायन हे सामूहिक असे. ते उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशा तीनच सुरांनी युक्त असायचे. अनेक ऋषिमुनींनी आपल्या बुद्धीने ध्वनि-नाद-स्वर या गूढ विषयाचा अभ्यास करून त्यात रसपोषकता आणली. कालांतराने तीन स्वरांचे विकसन सप्तस्वरात झाले. पुढे सामवेदाला संगीतकलेचा आधार म्हटले गेले. केवळ श्रौतयागांसाठी सामवेदाचा उपयोग होत असे. त्याला पुढे “गांधर्ववेद” मिळाला, जो संगीतकलेचा अधिकृत ग्रंथ बनला. शास्त्र  निर्माण झाले. यक्ष, किन्नर, गंधर्व, नर्तिका म्हणजेच अप्सरा यांचा संगीत हा व्यवसाय बनला. तोपर्यंत संगीत हे ‘’साधन म्हणून कधीच नव्हते. मोक्षमार्ग हे त्याचे ईप्सित त्या काळापर्यंत तरी टिकून होते॰ “मार्गी” संगीत हीच त्याची ओळख होती. त्यानंतर “देसी” संगीताला उठाव मिळाला. समाजातल्या सर्व घटकातल्या कलोत्सुक संवेदनाना ओळख मिळाली. या संगीताचा परिचय करून देताना प्रस्थापितांनी त्याची ओळख “कामाचार प्रवर्तित्वं देसित्वम” अशी करून दिली. पुढे भरतमुनींचे “नाट्यशास्त्र” प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर अशा असंख्य ग्रंथांची निर्मिती होत गेली. संगीतकलेला जनाधार आणि राजाश्रय  मिळाला.

स्वरप्रधान गायनाबरोबरीने किंबहुना त्याहून अधिक शब्दप्रधान संगीताची चलती सुरू झाली. याचे कारण अमूर्त संगीताला काहीसे व्यक्त रूप देण्याची किमया काव्यातून घडते हे रचनाकाराला सुचले. काव्यातल्या शब्दांना स्वर हे  रूप, रस, गंध यांचा लालिमा देतात. त्या सुंदरतेच्या मिलाफातून पाहता पाहता कवितेचे गीत बनते. छंदोबद्ध कविता तरी आपल्या पायात स्वयंभू पैंजण बांधूनच अवतीर्ण होतात. मग कुणी नर्तकी आपल्या अभिनयातून, अंगविक्षेपातून आणि पदन्यासातून त्या शब्दांच्या अर्थाचे मोरपीस रसिकांच्या मनावरून अलगद फिरवू लागतात. कुणी त्या शब्दांना सुरील्या चांदण्याचे अंगडेटोपडे चढवून सुश्राव्य करतात. अवीट स्वरलहरींवर शब्दांचे सोनेरी कवच चढले की बस्स, चढत्या उतरत्या आंदोलनांवर जड देहाचे भान विसरून विहरणारे माणसाचे भावनिक मन हलके हलके होऊन जाते. अनुभवाला आलेले दु:खाचे, विरहाचे अथवा कोणतेही कटु भाव त्या शब्दांशी एकरूप होऊन संवेदनशील मन गलबलून जाणे हे नेहमीचे जीवन बनून जाते! क्वचितच असा माणूस भेटेल की ज्याला संगीत आवडत नाही. गाता येवो अथवा न येवो, माणूस गात असतोच. ते निरोगी मनाचे एक लक्षण आहे. कुणी चालता चालता गातो, तर कुणी काम करण्याच्या आपल्या जागी हलक्या आवाजात संगीत ऐकवते ठेवतो.  

संगीताच्या माध्यमातून आपल्या आराध्य दैवताशी तादात्म्य साधणे  सोपे जाते असाही बहुतेक कलाकारांचा अनुभव आहे. संगीताच्या शास्त्रवेत्त्यांनी कांही राग देवाच्या आराधनेशी “जोडून” ही दिले आहेत. विशेषकरून प्रभातीचे राग देवपूजेचा अनुभव देणारे असतात असा भाव त्या स्वरात निर्माण केलेला असतो. बर्‍याचदा हिंदुस्तानी रागशास्त्र शिकवताना कोणत्या रागातून कोणता रस निर्माण होतो, याचेही वर्णन दिलेले असते. परंतु अशा रागांच्या बंदिशींचा अर्थ “त्या” रसाला पोषक असतोच असे नाही. कित्येक संतकवींनी आपल्या रचना लिहून त्याचे राग आणि तालसुद्धा नमूद केलेले पाहावयाला मिळते. हिंदुस्तानीपेक्षा कर्नाटक संगीतामधील रचनांचे गायन आजसुद्धा त्यावर नमूद केलेल्या रागांचा उपयोग करून केले जाते.

साहित्यातील नवरस रागदारी संगीतातूनही अनुभवता येतात आणि कांही विवक्षित रागांची त्या त्या रसासाठी योजना केलेली असते. याची पुष्टी करण्यासाठी तानसेनासारख्या महान गायकांनी आपल्या गायनाने पर्जन्यवृष्टी केली, अग्नि निर्माण केला, पत्थराला खंडित केले असे दाखले देतात. यातली सत्यता-असत्यता पडताळून पाहणे हा या लेखाचा उद्देश नसला तरी आजच्या पिढीने पंडित भीमसेन जोशींसारख्या महान गायकाच्या रसिकांवरील गारुडाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच.

वरील विवेचनात रागातल्या स्वरांच्या शक्तीपेक्षा रागदारीसाठी निवडलेल्या काव्याची महती सर्वसाधारण श्रोत्याला अधिक भावते. अर्थात हा विषय मोठा आहे आणि या लेखाच्या प्रयोजनाशी त्याचा तसा संबंधही नाही. त्यामुळे हा उल्लेख केवळ “धावता” आहे हे समजून घ्यावे.         

अध्यात्म आणि संगीत हा विषय तसा गहन आहे. त्याबद्दल बोलणे अथवा लिहिणे “ज्याचा जैसा भाव त्यासी तैसा तू पावसी” अशा अर्थाचा आहे. जसे एखादा राग कुणाला कसा भावेल याचे काही गणित निश्चित नसते. त्या रागाचा स्वभाव पुस्तकामध्ये कोणता लिहिला गेला आहे याला तसे काहीच महत्व नसते. शास्त्रीय संगीतामध्ये रस घेणारा प्रत्येक रसिक एकाच पद्धतीने रसानुभव घेईल याची काहीच शाश्वती नसते. संगीतामध्ये षडजाला आधार मानून रागांची बांधणी झालेली असते. सगळे राग “सा” पासूनच उपजतात. परंतु ललत या रागामध्ये शुद्ध मध्यमाचा अधिकार षड्जापेक्षा अधिक असतो. त्याचा प्रभाव सप्तकाच्या पूर्ण स्थापत्यालाच छेद देणारा असतो. काही राग “सा” च्या ऐवजी “नी” चा उपयोग आरोहासाठी करतात. उपशास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा मध्यम या स्वराचे प्राधान्य ठेवून किंवा त्यालाच आधार मानून पुढचा विस्तार करण्याची पद्धत आहे. हे सारे ज्ञान गुरुमुखीच समजून घ्यावे लागते. अनुभवी गुरुच ज्ञानपिपासू शिष्याचे निराकरण करू शकतो. पुस्तकातील चित्रे पाहून योगाभ्यास करणे जितके जोखमीचे असते तितकेच पुस्तकातले “नोटेशन” पाठ करून गायन शिकण्यासारखे धोकादायक ठरते. त्यामुळे संगीतविद्या, अध्यात्मविद्या, योगविद्या, वेदविद्या, वेदान्तशास्त्र, दर्शनशास्त्र हे सारे विषय गूढ, विस्तृत आणि गहन असे आहेत. जितके उंचावर जावे तसे अधिक क्षितिज अतिविस्तृत दिसू लागते तसे या सार्‍या विषयांचे अध्ययन जितके करावे तितके अधिक व्यापक दिसू लागते. त्यामुळेच या विद्या देणारा हा त्या घेणार्‍यांपेक्षा जास्त संयमी, विचारशील आणि विनम्र बनत जातो. (तो ‘’तसा’’ बनावा ही अपेक्षा!!)

संगीत आणि अध्यात्म या विषयावर अधिक लिहावे ते तरी काय?

अस्तु!!