आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. आजच्या मराठी वाचकाला (केवळ whatsapp सोडुन) केशवकुमार कोण आणि केशवसुत कोण हे ठाऊक जर असेल तर प्रश्नच उद्भवत नाही! केशवसुतांनी कवीचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी लिहिलेली अचाट प्रतिभेची कविता वाचून थोर साहित्यिक, पत्रकार, नाटककार, टीकाकार, कवी, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी, प्रभावी वक्ता आणि महान विनोदी लेखक, विडंबनकार प्रल्हाद केशव अर्थात आचार्य अत्रे यांनी लिहिलेली ही त्यावरील विडंबनकविता वाचून हंसून पोट दुखले नाही असं वाचक एकेकाळी एकही नसावा.
The purpose of this blog is to highlight some important points of ancient Indian Music through write ups and articles. There is a wide variety of musical thoughts, instruments and styles Here some old articles are re-written with new references. My published books are - The Beginners' Book On Hindustani Music (2 Editions), Tabla - Principles And Art, Naad Rang (Marathi) and Vaadye Nanapari (marathi). Exploring path is always enjoyable.
Saturday, June 13, 2026
केशवकुमार, अर्थात आचार्य अत्रे
आम्ही कोण म्हणुनि काय पुसशी आम्ही असू लाडके
देवाचे दिधले असे जग तये आम्हास खेळावया,
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया
दिक्कालातुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके!
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हापुढे ते फिके,
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करामाजि या
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच! सुधा कृतीमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे,
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यापासुनी लाभते!
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा – विकेल काडीमोलावरी हे जिणे!
- केशवसुत
“आम्ही कोण?” म्हणुनि काय पुसता दाताड वेंगाडुनी?
‘फोटो’ मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला?
किंवा ‘गुच्छ’ ‘तरंग’ ‘अंजली’ कसा अद्यापि ना वाचिला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रातुनी?
ते आम्ही – परवाङमयातिल करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यादेखत घालूनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही त्यांचा ‘उदे’
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके!
Subscribe to:
Posts (Atom)